नेहेमीचीच ती वाट होती
सभोवतालची गर्दीही तीच होती
अन त्या वाटेवरून प्रवास करणारी मी
अचानक एका वळणार आपली भेट झाली
वाटही तीच होती, गर्दीही तीच होती
पण प्रवासात आता मला तुझी साथ होती
तुझ्या असण्याची मला आता सवयच झाली होती
वाटही तीच होती, गर्दीही तीच होती
तुझ्याही नकळत मी तुझ्यात गुंतत जात होते
बोललो नाही जरी कधी, डोळे मात्र बोलत होते
वाटही तीच होती, गर्दीही तीच होती
तुझ्यासह प्रवास माझ्यासाठी सुखद यात्रा होती
ध्यानीमनी नसतानाची ती शेवटची भेट
वाटही तीच होती, गर्दीही तीच होती
तू बोलत होतास, मी निशब्द होते..
हळूहळू नजरेसमोरून दूर होत होतास तू
वाटही तीच होती, गर्दीही तीच होती
मी मात्र तिथेच उभी होती गोठलेल्या नजरेने तुला शेवटची पहात
बरंच काही बोलायचं होतं बरंच काही सांगायचं होतं
वाटही तीच होती, गर्दीही तीच होती
मूक झालेले शब्द होते आणि मनात कोंडलेलं वादळ
आज नेहेमीचीच ती वाट आहे
सभोवतालची गर्दीही तीच आहे
अन त्याच वाटेवरून प्रवास करणारी.. एकटी मी...